उमदी ग्रामपंचायतीकडून औषध फवारणी

0
11



उमदी,संकेत टाइम्स : कोरोना विषाणुचा वाढता धोका लक्षात घेऊन उमदी ता.जत येथील सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.कोरोना दुसऱ्या लाटेतील विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी उमदी ग्रामपंचायतीने सतर्कतेची पावले उचलली आहेत.त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावांमध्ये निर्जंतुकीकरण करत औषध फवारणी केली आहे.




 तसेच सर्व दुकानदारास जनता कर्प्यू कडकडीत बंद पाळत ग्रामपंचायत, तालुका प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन केले आहे.गावातील गर्दीच्या ठिकाणी तसेच शिवाजी चौक, गांधी चौक, ग्रामपंचायत परिसर, मलकारसिद्ध मंदिर परिसर,आंबेडकर नगर, इंदिरानगरसह सार्वजनिक रस्ते,परिसरात ट्रॅक्‍टरच्या साह्याने औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न केल आहे. 







तसेच सरपंच वर्षा निवृत्ती शिंदे यांनी पुणे मुंबई येथून व बाहेरून आलेले लोकांनी उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपले नाव नोंदवून तपासणी करून घ्यावे व बाहेर फिरु नये असे आव्हान केले आहे.त्याशिवाय मास्क,सोशल डिस्टसिंग, सँनिटायझर काटेकोर वापर करावा.परिस्थिती भहवाह झाली आहे. आपली दक्षताच कोरोनाला रोकू शकते,त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घ्यावी,विनाकारण कुठेही फिरू नये,असे आवाहन कॉग्रेस नेते निवृत्ती शिंदे यांनी केले आहे.




उमदी ता.जत येथे ग्रामपंचायतीकडून  औषध फवारणी करण्यात येत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here