माडग्याळ, संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्य पदवीधर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी वैभव गायकवाड यांची निवड करण्यात आली.
तालुक्यातील मोकाशेवाडी येथील छोट्याशा गावातून सुशिक्षित असे इंजि.वैभव गायकवाड हे येतात.यापुर्वी ते सुजित थेटे यांच्या नेतृत्वाखाली जत तालुका अध्यक्षपदी कार्यरत होते.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
वैभव गायकवाड म्हणाले,पदवीधर होऊनही बेरोजगार असणाऱ्या तरूणांना नोकरी,व्यवसायासह आपल्या क्षमतेनुसार सक्षम करण्यासाठी यापुढे मी संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी,पदवीधर तरूणांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी संघटना कार्यरत आहे.या संघटनेच्या न्याय हक्कासाठी प्रशासनावर पदवीधराचा दबाव गट निर्माण होईल,असे मजबूत संघटन करण्यासाठी माझा प्रयत्न राहिल.
यावेळी पदवीधर संघटनेचे तालुका सचिव अंबादास चौगुले,पत्रकार रमेश चौगुले उपस्थित होते.







