डफळापूर, संकेत टाइम्स : जत पश्चिम भागातील डफळापूर सह परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने गावनिहाय आरोग्य विभागाकडून सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.बुधवारी मिरवाड येथे या सर्वेक्षणात केलेल्या 50 जणांच्या कोरोना चाचणीत 13 जण बाधित आढळून आले आहेत.
डफळापूर जि.प. मतदार संघातील गावात रुग्ण वाढीचा आकडा वाढतच असल्याचे लक्षात येताच कॉग्रेसचे युवा नेते तथा पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून या सर्व गावाचा सर्व्हे करावा,असे आवाहन केले होते.बुधवारी एका पथकाकडून मिरवाड पासून नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
अनेक नागरिकांनी कोरोना सदृश लक्षणे असतानाही तपासणी केली नसल्याने कोरोनाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे गावनिहान सर्वच नागरिकांची कोरोना अन्टेजन टेस्ट घेण्यात येत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोकणे शक्य होणार आहे. तालुका प्रशासनाने तपासणी कीट,औषधे उपलब्ध करून द्यावीत,असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.







