को.बोबलाद,संकेत टाइम्स : आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेत्या, सावंत ग्रुपच्या सर्वेसर्वा सौ.सारिकाताई विनोद सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत को.बोबलाद मधील गरीब व गरजू लोकांना गूळ व डाळ वाटप करण्यात आले.
कोरोना काळात अनेक कुंटुबे अडचणीत आहेत.त्यांना मदतीचा हात म्हणून अनावश्यक खर्च टाळत सांवत परिवाराने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कोरोना काळात अनेक मजूर,गरजू नागरिकांच्या हाताला काम नाही.अशा नागरिकांना डाळ व गुळ वाटप करण्यात आले. अक्षयतृत्तीया सणाच्या पार्श्वभूमीवर या आमच्या मदतीचा काहीअंशी गरजू नागरिकांना मदत होईल,असे सारिकाताई सांवत यांनी सांगितले. आता अडचणीचा काळ असल्याने आणखीन काही दानशूर नागरिकांना अडचणीतील कुंटुबियांना आपल्या परीने मदत करावी,असे आवाहनही सांवत यांनी केले.यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
कोंतेबोबलाद ता.जत येथील सांवत ग्रुपच्या सारिकाताई सांवत यांच्या वाढदिवसा निमित्त जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.







