आंवढीत विनाकारण फिरणाऱ्यांना आता दंडाचा दणका | आजपासून ग्रामपंचायतीची मोहिम

0
27



आवंढी संकेत टाइम्स : जत तालुक्यातील आवंढी ग्रामपंचायतीने उपाय योजनांसाठी तातडीचा निर्णय घेत गावात विना मास्क, विनाकारण भटकंती करणाऱ्या व्यक्तींवर 50 रुपये दंडाची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याशिवाय किराणा दुकानदारांनी लोकांना घरपोच माल द्यावा,अशा सुचना दिल्या आहेत. दुध डेअरीवर ही विना मास्क व्यक्ती आढळ्यास डेअरी मालकांला दंड करण्यात येणार आहे. 







त्याशिवाय कारवाई करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य,सरपंच आणि उपसरपंच,ग्रामसेवक व स्वयंसेवक सदस्य यांचेशी हुज्जत घालणाऱ्यांना 1,000/- रुपयेचा दंड वसूल केला जाईल,हा दंड  न भरल्यास त्याच्या ग्रामपंचायत मालमत्तावर बोजा चढविण्यात येणार आहे. 

गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून येऊनही बंद काळात अनेक नागरिक विनाकारण फिरत असल्याने धोका निर्माण झाला आहे.






 त्यामुळे ग्रामपंचायतीने निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आता दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायतीची एक समिती अशा नागरिकांना रोकण्यासाठी काम करणार आहे.यासाठी सोशल मिडियाचाही आधार घेतला जाणार असून कोणत्याही नागरिकांनी या नियमाचा अनाधार केला तर कारवाई अटळ असल्याचे ग्रामपंचायती कडून सांगण्यात आले.







या मोहिमेत गावाला कोरोना योध्दातून वाचविण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.  

  

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here