जत,संकेत टाइम्स : जत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रूग्ण आढळून येत असलेतरी जत तालुका प्रशासन व नगरपरिषद यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे शहरातील जनताकर्फ्यु चा फज्जा उडताना दिसत आहे.जत शहरासह तालुक्यात दिनांक 15 मे पर्यंत जनताकर्फ्यु लावण्यात आला असलातरी या जनताकर्फ्यु च्या कालावधीतच जत शहरासह तालुक्यातील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.
तर शहरासह तालुक्यात दररोज पाचसहा कोरोनाचे रूग्णाचा मृत्यु होत आहेत.जनता कर्फ्यु कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व अस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असलातरी काही लोक जाणीवपूर्वक आपली दुकाने अर्धवट उघडी ठेवून चोरून व्यापार करताना दिसत आहेत.जत शहरातील प्रमुख ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असलातरी ही बिनकामाचं फिरणारे हुल्लडबाजी करणारेंची संख्या ही काही कमी होत नाही.
अशा हुल्लडबाजी करणारेवर पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. गत कोरोना लाटेत तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शेळके यानी कोरोनाचे कालावधीत चांगल्या प्रकारे वचक बसविला होता.त्यामुळे त्यांची दहशत होती.कोरोना रूग्णांची संख्या ही आटोक्यात येत होती.परंतु सद्याचे पोलीस निरीक्षक हे कारवाई करण्याऐवजी प्रबोधन जास्त करतात.परंतु अशा वेळी प्रबोधनाबरोबरच कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
जत शहरात सद्यपरिस्थितीत दररोज अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील प्रमुख बाजारपेठेत रिकामटेकडे फिरणारेंची संख्या ही वाढत आहे.बॅका व पतसंस्थेचे नावाखाली हे लोक गावभर फिरून कोरोनाचा प्रसार करत आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात सर्व वित्तीय संस्था या लाॅकडाऊनचे कालावधीत बंद ठेवण्यात आल्या असून जतचे उपविभागीय अधिकारी यानी जत मधील ही वित्तसंस्था बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा,अशी स्थिती सध्याची आहे.
आताच जर पोलीस प्रशासनाने व जत नगरपरिषदेने कठोर भूमिका घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या तरच जत शहरासह तालुक्यातील कोरोनाची साखळी तुटेल.अन्यथा कोरोनाचा तालुकाभर विस्कोट झाल्याशिवाय राहणार नाही.









