जत,संकेत टाइम्स : जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी येळवी ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली.
ग्रामसेवक संजय शिंदे यांच्याकडून येळवी गावातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. गावातील कोरोना रुग्णांची संख्या तसेच उपाययोजना याबाबतची माहिती जाणून घेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले.त्याशिवाय लसीकरण वाढविण्याबाबत जनजागृत्ती करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी येळवी येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायत स्तरातून मदत करण्यात येत असल्याचे सांगत शाळेचे वीज जोडणी अद्याप केलेली नाही,ती करावी अशी मागणी केली.तात्काळ घरणगुत्तीकर यांनी शाळेची वीज जोडणी करण्याचे आदेश दिले.
यावेळी सहशिक्षक संजय कोळी, तात्याराव चव्हाण, राजू साळुंखे, बाळू वाघमारे उपस्थित होते.
येळवी ग्रामपंचायतीला बीडीओनी दिली अचानक भेट दिली,यावेळी ग्रामसेवक संजय शिंदे, संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर उपस्थित होते.






