करजगी,संकेत टाइम्स : कोरोनाला वेशीवर रोकणाऱ्या करजगी ता.जत येथे कोरोनाच्या इतर ठिकाणच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती कडून सोडियम क्लोराईड औषधाची फवारणी करण्यात आली. विशेष म्हणजे दुसऱ्या लाटेत करजगी करांनी खबरदारी घेत कोरोनाला वेशीवर रोखले असून दुसऱ्या एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
ग्रामपंचायत,पदाधिकारी व नागरिकांच्या सतर्कतेमुळे करजगी सुरक्षित आहे.
संरपच साहेबपाशा बिराजदार,उपसंरपच शाबू बालगाव,ग्रामसेवक वसंत वाघमोडे,तलाठी हणमंत बामणे समुदाय आरोग्य अधिकारी विजयलक्ष्मी बसर्गी,पोलीस पाटील राजू तेली,लिपिक सायबण्णा डुमणे व आशा वर्कर्स यांचे कष्ठ कामी आले आहे.
जत तालुक्यातील असे पहिले गाव आहे,तेथे कोरोनाला रोकण्यात यश मिळविले आहे.
संरपच साहेबपाशा बिराजदार म्हणाले,आम्ही पहिल्या कोरोना लाटेपासून मोठा अनुभव घेतला आहे.बाहेरून आलेल्या नागरिकांना अलगीकरण केले,गर्दी,मास्क याचा प्रचार केला.दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रभाव वाढत असताना गावात जनजागृत्ती करत,खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने व माझे सहकारी,पोलीस पाटाल,आरोग्य अधिकारी, कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सामुदायिक प्रयत्नाला हे यश मिळाले आहे.
करजगीत कोरोना रुग्ण आढळून येण्या अगोदरचं गाव निर्जुकीकरण केले जात आहे.








