जत,संकेत टाइम्स : आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या माध्यमातून सुरू असलेेल्या डफळापूर,उमदी येथील कोविड सेंटर येथे ऑक्सीजन, व्हेंटिलेटर अशा सुविधा रुग्णांना द्याव्यात,अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी केली आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी खऱ्या अर्थाने चांगल्या पध्दतीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
मात्र कोविड सेंटर म्हणून सुरू केलेल्या डफळापूर, उमदी येथील क्वॉरण्टाइन
सेंटरमध्ये फक्त होम आयसोलेशन सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.मात्र तेथे दाखल रुग्णाचे अचानक ऑक्सीजन पातळी खालावली तर तात्काळ त्याला ऑक्सीजन मिळण्याची गरज असते. मात्र तेथे तशी सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ऑक्सीजन, व्हेटिलेंटर, प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस,जेवन, व अन्य सुविधा उपलब्ध करून तालुक्यातील नागरिकांचे जीव वाचवावेत,असेही पवार म्हणाले.





