जतेत लवकरचं 100 बेडचे नवे कोविड रुग्णालय | भाजपाच्या‌ मागणीवरून पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतले पालकत्व

0
7



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.मात्र त्या प्रमाणात उपचारा मिळत नसल्याने अनेक नागरिकांना जीव गमवावा लागत आहे,त्या पार्श्वभूमीवर जत भाजपच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेत जत येथे व्हेटिलेंटर, ऑक्सीजन व प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस असलेले 100 बेडचे कोविड रुग्णालय काढावे,अशी मागणी केली.तसे निवेदनही देण्यात आले.




पालकमंत्री जयंत पाटील यांनी जतचे‌ पालकत्व घेत तात्काळ 100 बेडचे कोविड रुग्णालयासाठी डॉक्टर्स,कर्मचारी उपलब्ध करून देण्याबरोबर जागेची पाहणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डूडी,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात गुड्डेवार यांना दिले आहेत.




माजी आमदार विलासराव जगताप याच्या मार्गदर्शनाखाली जतच्या शिष्ट मंडळाने ना. पाटील यांनी भेट घेतली.जत तालुक्याची‌ परिस्थिती जाणून घेत लगेच‌ पालकमंत्री पाटील यांनी निर्णय घेतला आहे.जत तालुक्यात नव्याने 100 बेडचे किमान पाच व्हेंटिलेटर, ऑक्सीजन, औषधे प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस असलेले रुग्णालय लवकरचं सुरू होणार आहे. आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गुड्डेवार जत येथे जागेची पाहणी करणार आहेत.




स्वीय सहाय्यक अमोल डफळे यांना यासाठी पाठपुरावा करण्यास पालकमंत्री पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी सभापती मनोज जगताप, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार, उपनगराध्यक्ष उमेश सांवत,अण्णा भिसे,अजिंक्य सांवत,गौतम ऐवळे,संतोष मोटे यावेळी उपस्थित होते.



जत येथे 100 बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा मागणीचे निवेदन पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here