जतेत सोमवारी पुन्हा नवे अडीशे रूग्ण,सात जणांचा मुत्यू

0
0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात पुन्हा अडीशेवर नवे रुग्ण आढळून आले आहेत.तालुक्यात करण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तपासणीत 62 गावात 259 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.तर 155 रुग्ण सोमवारी कोरोना मुक्त झाले आहेत.






दुर्देवाने पुन्हा तालुक्यातील 7 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.तालुक्यात सध्या 1979 रुग्ण उपचाराखाली आहेत, त्यापैंकी 1801 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.एकूण संख्या 6235 तर मुत्यू संख्या 131 वर पोहचली आहे.  तालुक्यातील चिंता कायम असून आरोग्य विभाग,महसूल,पोलीस प्रशासन नागरिकांना सातत्याने दक्ष करत असतानाही बेपर्वाहीमुळे कोरोनाचा विस्फोट कायम आहे.






तालुक्यातील जत,बिळूर,पाच्छापूर,येळवी,जाल्याळ बु.येथे दहापेक्षा जास्त तर वाळेखिंडी,संख,उमदी,को.बोबलाद,शेगाव,मुंचडी,सनमडी,उमराणी,सोन्याळ,तिकोंडी,बनाळी,शेड्याळ,रामपूर,तिप्पेहळ्ळी,गोंधळेवाडी येथे पाचपेक्षा जादा रुग्ण आढळून आल्याने हि गावे धोका रेषेवर आली आहेत.







सोमवारचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण 259 ; जत 20 ,वाळेखिंडी 5 खलाटी 1, बिळुर 10, अचकनहळळी 1, लमाणतांडा 1, संख 8, उमदी 7, धावडवाडी 1, को.बोबलाद 5, वळसंग 3, शेगाव 8, तिल्याळ 1, मुंचडी 5, जा.बोबलाद 4, सनमडी 5, पाच्छापूर 20,उमराणी 6, अंकलगी 1, उटगी 4, सोन्याळ 8 खैराव 1, येळवी 9, डफळापूर 2, बेवणूर 1,हिवरे 1, जाल्याळ बु. 1, गुगवाड़ 2,तिकोंडी 7, व्हसपेठ 1, टोणेवाडी 2, भिवर्गी 3, कुंभारी 1, 







देवनाळ 1, आसंगी तु. 1, कोसारी 3, बनाळी 6, खोजानवाडी 1, शेडयाळ 6, आसंगी जत 1, बेळोंडगी 2, रामपूर 7, ऊटवाडी 3, बागेवाडी 1, सिंदूर 3, कुणीकोणूर 4, शिंगणहळळी 6,गोधळेवाडी 6, बिरनाळ 3, पॉडोझरी 7,वज्रवाड 2,धुळकरणवाडी 2, कासलिंगवाडी 2,बागलवाडी 1, वायफळ 1, एकुंडी 1, खिलारवाडी 1, लकडेवाडी 1, प्रतापुर 9, कागनरी 1,जाल्याळ बु 21, बोर्गी खु. 1



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here