आसंगी तुर्कमधिल जळीतग्रस्त कुंटुबियांना मानव मित्र संघटनेकडून मदत

0
8



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील तुर्क आसंगी येथे भिमु दऱ्याप्पा दलवाई यांच्या झोपडीवजा घरावर वीज कोसळून झोपडी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटना तातडीने तुर्क आसंगी येथे पोहचली व चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते दळवाई कुटूंबियांना रोख रक्कम व संसारपयोगी साहित्य देत मदतीचा हात दिला.







शुक्रवारी भिमु दळवाई यांच्या झोपडीवजा घरावर वीज कोसळून झोपडी जळून खाक झाली होती. 

या घटनेची माहिती मिळताच श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेकडून तुकाराम बाबा यांच्याहस्ते रोख रक्कम मदत म्हणून दिली.यावेळी मिरासाहेब मुजावर,अफजल मुजावर,सद्दाम मुजावर,संजय चव्हाण, परमेश्वर कोडग,बाळू डोंबळे,श्रवण बरकडे,नवनाथ नारले,भिमु दलवाई,






संतोष वाघे,तानाजी वाघे,सचिन कोडग,तुर्क आसंगीचे पोलीस पाटील आशपक पटेल,मोटेवाडीचे मानव मित्र बाळासाहेब मोटे, गोंधळेवाडीचे मानव मित्र सोहन धुमाळ आदी उपस्थित होते.हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या मदतीमुळे दळवाई कुटुंबास लाख मोलाची मदत झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.



आसंगी तुर्कमधिल जळीतग्रस्त कुंटुबियांना मानव मित्र संघटनेकडून तातडीने मदत देण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here