कोरोनासाठी आ.विक्रमसिंह सांवत यांच्याकडून एक कोटीचा निधी

0
3



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर कोविड सेंटर,रुग्णालय,ऑक्सीजन व साहित्यासाठी आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या निधीतून एक कोटीचा निधी दिला आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांना दिले आहे.







जत तालुक्यातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली होती.त्या पार्श्वभूमीवर आमदार सांवत यांनी गतीने उपाय योजना सुरू केल्या आहेत.नुकतेच‌ त्यांनी माडग्याळ येथील कोविड रुग्णालयाचे लोकार्पण केले आहे. येथे परिसरातील रुग्णांची चांगली सोय झाली आहे.






आ.सावंत म्हणाले,जत मतदार संघात कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे.त्यामुळे मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोई सुविधा आवश्यक साधन सामग्री देण्याकरिता आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2021-22 अंतर्गत 1 कोटी निधी मंजूर निधी खर्च करण्यात येणार आहे.यामध्ये प्रामुख्याने माडग्याळ रुग्णालयासाठी 10 के.व्ही.जनरेटर,प्लस ऑक्सी मीटर 150,थर्मल गण 150,ऑक्सीजन कोन्सन्ट्रेटिव 15,कापडी मास्क 2,000,एन 95 मास्क,सॅनिटाईझर 100 मीली 50 कँन,सॅनिटाईझर 5 मी ली 50 कँन,ग्लोज 500,पीपीई किट 1500,फेसशिल्ड 350, स्पेअरींग मशीन 100 तसेच शववाहिका व ऑक्सीजन जनरेशन देखील देण्यात येणार आहे.






तालुक्यातील कोरोना नियत्रंणात आणण्यासाठी यापुढेही उपाय योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

आ.सावंत म्हणाले,गेल्या दोन वर्षांतून आपल्या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.जनतेनी हा आजार नष्ट होई पर्यंत शासनाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे.तालुक्यातील कोरोना रुग्णांना तालुक्यातच उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.






त्या पार्श्वभूमीवर माडग्याळ येथे 40 बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे,तसेच दत्त पतसंस्था,विक्रम फौंडेशन यांचे वतीने डफळापूर येथे 40 बेडचे रुग्णालय सुरू केले असून उमदी येथेही लवकरच 40 बेडचे रुग्णालय सुरू करीत आहोत.या गंभीर काळात सामाजिक संस्था सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी राजकारण न करता लोकांना मदतीचा हात द्यावा, ही लढाई सामूहिक आहे. लोकांचे प्राण वाचले पाहिजे यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन,आ.विक्रमसिंह दादा यांनी केले आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here