कोरोनाचे आरटीपीसीआर रिपोर्ट येण्यास दिरंगाई

0
2

जत‌ : जत तालुक्यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड आरटीपीसीआर तपासणीनंतर रुग्णांना रिपोर्टची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.तालुुक्यातील‌ डफळापूर,बिळूर,कोंतेबोबलाद,संख,उमदी,येळवी,शेगाव,वळसंग या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांचे 3 एप्रिल रोजी आरटीपीसीआरचे नमुने घेऊन सांगली येथील लॅबला पाठविले होते. नमुने पाठवून 4 दिवस झाले; परंतु अजूनही नागरिकांचे रिपोर्ट प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झाले नाहीत.सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे कोरोना तपासणी रिपोर्ट लवकर मिळणे आवश्यक आहे. नागरिकांचे कोरोना रिपोर्ट उशिरा मिळत असल्यामुळे नागरिकांना कोरोना आहे किंवा नाही याचीच चिंता लागलेली असते. त्यामुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण असते.सांगली आरोग्य अधिकाऱ्यांनी जत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरटीपीसीआर रिपोर्ट लवकर द्यावेत, अशी मागणी होत आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये आरटीपीसी तपासणी लॅब एकच आहे. नागरिकांचे आरटीपीसी तपासणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोना रिपोर्ट येण्यास दिरंगाई होत आहे.

डॉ.संंजय बंडगर, तालुका आरोग्य अधिकारी,जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here