जत,संकेत टाइम्स : कुडणूर ता.जत येथे 8 जणांच्या संशयास्पद मुत्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात आली आहे.मुत्यू झालेल्या संबधित 8 रुग्णाच्या घरातील अन्य सदस्यांची कोरोना अँन्टिजन टेस्ट घेण्यात आल्या,त्यात संबधित मयत व्यक्तीच्या अन्य सर्व नातेवाईकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठ दिवसात कुडणूर मधील आठ जणांचा संशयास्पद मुत्यू झाला होता.त्यामुळे गाव भितीच्या छायेत होते.कोरोनाची भिती बाळगली जात होती.तरीही येथे नेमलेले डॉक्टर्स,कर्मचारी गावाकडे फिरकले नसल्याचा ग्रामस्थाचा आरोप होता. गावातील संतप्त नागरिक,लोक प्रतिनिधीनी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांच्यासह डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक मारत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.
दरम्यान याबाबत दैनिक संकेत टाइम्समध्ये वस्तूनिष्ठ वृत्तही प्रकाशित करण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार सचिन पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुडणूरला भेट दिली.
यावेळी मयत झालेल्या नागरिकांच्या घरातील इतर सुमारे 50 नातेवाईकांची अँन्टिजन टेस्ट घेण्यात आली होती.त्यापैंकी सर्वाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अन्य 15 नागरिकांच्या तपासणीत दोघाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
कुडणूर मध्ये डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे एक सामुदायिक अधिकारी,2 आरोग्य सेवक,3 आरोग्य सेविका व एक आशा असे 6 जणांचे पथक नेमण्यात आले आहे.मंगळवारी त्यांनी 75 जणांची कोरोना तपासणी केली.बुधवारीही पुन्हा नागरिकांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत.
फक्त 10 नागरिकांनी लस घेतली
कुडणूर गावात 45 वर्षावरील 10-12 नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. डफळापूर केंद्रात सर्वाधिक कमी लसीकरण झालेल्या दोन गावापैंकी कुडणूर हे एक गाव आहे.जगात एकिकडे कोरोनावर लस प्रभावी असल्याचे स्पष्ट असतानाही कुडणूर सारख्या शिक्षित गावात मोफत असणारी लसही घेण्यात उदासीनता धोका वाढविणारी आहे.