कोरोना,ड्राय डे चा विसर खुलेआम दारूविक्री | जत‌ तालुक्यात उत्पादन शुल्क विभाग आहे काय?

0
12



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचे नियम ढाब्यावर बसवून 1 मे महाराष्ट्र दिन ड्राय दिन असतानाही देशी दारू,बियरबार,वाईनशॉप,बियर शॉपीमधून समोरचा दरवाजा बंद ठेवू  बेधडक दारू विक्री सुरू होती.त्यामुळे जत‌ तालुक्यात उत्पादन शुल्क विभाग आहे काय? असा काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे.





जत तालुक्यातील दारू विक्रेत्यांनी सर्व सिमा ओंलाडल्या आहेत.कोरोनाचा विस्फोट झालेला असतानाही तालुक्यातील पैशाला हापापलेल्या दारू विक्रेत्यांकडून चढ्या दराने सर्रास दारुविक्री सुरू आहे. दररोज दारू दुकानासमोर असलेली गर्दी सर्वकाही स्पष्ट करत असतानाही उत्पादन शुल्क विभाग, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत.

यापेक्षा कहर म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिन ड्राय दिन असतानाही बेधडक दारू विक्री तीही चढ्या दराने सुरू होती.जत पश्चिम भागातील डफळापूर मध्ये दारू विक्रेत्यांनी सर्व सिमाच ओंलाडल्या आहेत.




ड्राय डे हा विषयच शनिवार महाराष्ट्र दिनी गुंडाळून ठेवत‌ बेधडक दारू विक्री सुरू होती.याकडे उत्पादन शुल्क, जतच्या पोलीसांचे दुर्लक्ष चर्चेचा विषय असून त्यांच्या अशा दुर्लक्षाने ड्राय डे काय असतो हेही दारू विक्रेत्यांनी विसरले आहेत.डफळापूर सह‌ तालुक्यातील ड्राय डे दिवशी सुरू असलेल्या दुकानमधील मालाची स्टॉक रजिस्टरची तपासणी करून संबधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 




जत पोलीसाची शेगावमध्ये कारवाई


ड्राय डेला बेकायदा दारू विक्री केल्याप्रकरणी शेगाव,जत येथील औषध दुकानावर जत‌ पोलीसांनी कारवाई केली.शेगाव येथील विलास गोपीनाथ शिंदे वय 42 याला ताब्यात घेत 2815 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.संबधित माल कोठून आणला यांचा तपास करून संबधित दुकान बंद करण्यात बाबत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here