जतच्या कोरोना स्थितीचा जिल्हापोलीस प्रमुखांनी घेतला आढावा
जत,संकेत टाइम्स : जत डिवायएसपी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीतकुमार गेडाम यांनी कोरोना पार्श्वभूमीवर बैठक घेतली.यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, डिवायएसपी रत्नाकर नवले,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,पोलिस निरिक्षक उत्तम जाधव,तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर,नगरपरिषदेच्या श्रीमती कदम उपस्थित होते.
यावेळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णाच्या अनुषंगाने सुरक्षेचा आढावा गेडाम यांनी घेतला.जिल्हा पातळीवर सर्व विभागाने समन्वय साधून काम केल्याने चांगला परिणाम दिसून आला आहे.तशाच पध्दतीने तालुका स्तरावर समन्वय साधत काम करावे,यामुळे कोरोना रोकण्यात यश मिळेल.तालुक्यात सुरू असलेल्या चेक पोस्ट,कंटेनमेंन्ट झोन,कोविड केअर सेंटर,लसीकरण केंद्रे,हॉटस्पॉट गावाचा आढावा घेतला.
गेडाम म्हणाले,जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढला आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,मास्क सामाजिक अंतर,यांचे काटेकोर पालन करावे,होम आयसोलेशन,रुग्ण घराबाहेर फिरणार नाहीत,याबाबत काळजी घ्यावी,नॉर्मल लक्षणे वाटल्यास तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यावी, वेळेत औषधोउपचार मिळाल्यास कोरोनाचा रुग्ण लवकरं बरा होता,पोलीसांनी प्रशासनाच्या बरोबरीने कोरोना रोकण्यासाठी प्रभावीपणे काम करावे,असे आवाहनही यावेळी गेडाम यांनी केले.
जत येथील डिवाएसपी आयोजित बैठकीत बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम