जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कायम आहे.सोमवारी तालुक्यातील 35 गावात कोरोनाचे एकूण 93 रुग्ण आढळून आले आहेत. तर पुन्हा तीन रुग्णाचा कोरोनामुळे दुर्देवी मुत्यू झाला आहे.तब्बल 51 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे.
जत शहरात पुन्हा नवे 20 रुग्ण आढळून आले आहेत.डफळापूर,शेगाव मध्ये पाचपेक्षा रुग्ण सापडल्याने ग्रामीण भागातील ही दोन गावे धोक्याच्या सीमेवर आहेत.कोरोनाचा ग्रामीण भागात होत असलेला विस्तार चिंता वाढविणारा आहे.
तालुक्यात सध्या 912 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 751 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
होम आयसोलेशन रुग्णाच्या बेपर्वार्ह पणामुळे कोरोनाचा उद्रेक झपाट्याने होत आहेत. कंटेटमेंट झोन करण्याची यानिमित्ताने वेळ आली आहे. अन्यथा तालुक्यातील कोरोनाचा प्रसार रोकणे कठीण होऊन बसणार आहे.
तालुक्यातील कोरोना बाधित संख्या 3727 वर पोहचली असून आतापर्यत 89 रुग्णाचा मुत्यू झाला आहे.
जत तालुक्यात कोरोनाने विक्राळ रुप धारण केले आहे.
तरीही नागरिक,व्यापारी बेफीकीर असल्याचे सातत्याने आढळून येत आहे.त्यामुळे प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करूनही कोरोना कमी होत नसल्याचे समोर येत आहे.अशीच परिस्थिती राहिली तर कोरोना आणखीन किती जीव घेईल सांगता येणार नाही.
जत तालुक्यात सोमवारी आढळून आलेले रुग्ण असे,
जत शहर 20,अंतराळ 1,शेगाव 5,आंवढी 1,डफळापूर 6,को.बोबलाद 1,करेवाडी ति.1,दरिबडची 1,संख 4,गुड्डापूर 2,सोन्याळ 2,उटगी 2,माडग्याळ 1,निगडी बु.1,खोजानवाडी 1,बिळूर 4,बसर्गी 3,गुगवाड 1,उमदी 2,रामपूर 1,सोनलगी 1,पाच्छापूर 2,उमराणी 2,मेंढिगिरी 1,जाल्याळ खु.1,रेवनाळ 1,बनाळी 3,लंवगा 2,विजापूर 3,मंगळवेढा 3 असे 93 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
होम आयसोलेशन रुग्ण कोरोना बॉम्ब
जत तालुक्यात होम आयसोलेशन रुग्णाची संख्या मोठी आहे.दररोज वाढणाऱ्या रुग्णापैंकी सामान्य लक्षणे असणारे जवळपास 80 टक्के रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असतात.मात्र गेल्या काही दिवसात हे होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्णच कोरोनाचा प्रसार करण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे.
त्याचा थेट कुंटुबात,सार्वजनिक ठिकाणचा वावर कोरोना रुग्ण वाढवणारा ठरत आहे.थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात असे रुग्ण व नातेवाईक बिनधास्त फिरत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा सांगूनही कोरोना पॉझिटिव्ह असलेले होम आयसोलेशन मधिल रुग्ण मला काय झाले नाही म्हणत फिरत आहेत.त्यामुळे मोठा प्रमाणात संसर्ग वाढत आहेत.
कंटेनमेंट झोन गरजेचा
कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या रुग्णाच्या घराला तरी किमान कंटेनमेंट झोन करण्याची गरज आहे. अनेकवेळा कोण पॉझिटिव्ह आहे हे लक्षात येत नसल्याने इतरांचा त्यांच्याशी संपर्क होत आहे.
शिक्के मारण्याची गरज
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या हातावर गतवेळी प्रमाणे यावेळीही शिक्के मारण्याची ग्रामपंचायत स्तरावर कारवाई करण्याची गरज आहे.
कोरोना अहवाल लवकर गरजेचा
कोरोनाचे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांचे स्वाब घेतल्यानंतर मिरज येथील लँबोरेटीमधून रिपोर्ट येण्यास चार-चार दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णही रिपोर्ट नसल्याने सार्वजनिक ठिकाणी फिरत राहतो.किंबहुना आरोग्य विभागाकडून अलगीकरण मध्ये राहण्याची सुचना देऊनही त्यांच्याकडून खबरदारी घेतली जात नसल्याने रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.