जत,संकेत टाइम्स : संख येथून बेकायदा वाळू भरून चालेल्या ट्रकला जत पोलीसांनी पकडले.आण्णासाहेब मोहन चव्हाण (रा.पिंपरी मळा जत),नागेश चंदन पांढरे (रा.जत) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत अशोक लेंलड कंपनीचा टिपर,वाळूसह पाच लाख तीस हजाराचा मुद्देमाल जत पोलीसांनी जप्त केला आहे.
अधिक माहिती अशी,जत तालुक्यात बेसुमार सुरू असलेल्या वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर जत पोलीसाच्या गस्त पथकाला हा टिपर (एमएच 10,एडब्लू 7080) हा वाळू भरून येंत असल्याचा दिसला.
पथकातील पोलीस फौजदार आप्पासाहेब कत्ते यांनी त्यांच्याकडे वाळूचा परवाना विचारला मात्र तो आढळून आला नसल्याने टिपर पोलीसांनी ताब्यात घेत ठाण्या आणून लावले आहे.डायव्हर आप्पासो चव्हाण याला अटक करण्यात आले असून नागेश पांढरे अद्याप फरार झाला आहे.
जत पोलीसांनी पकडलेला टिपर