जत तालुक्यात मंगळवारी नव्या रुग्णाचे शतक पार | जत,डफळापूरसह 6 गावे हायरिस्कवर ; 28 गावात रुग्ण आढळले

0
25



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील 28 गावात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.तालुक्यातील जत शहर,डफळापूर, येळवी,शेगाव,प्रतापपूर,लोहगाव,वज्रवाड,अंकलगी या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने ही गावे सध्या धोक्याच्या कक्षेत आहेत.मंगळवारी तब्बल. 112 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.







गेल्या चार दिवसात जत तालुका कोरोनाने व्यापला असून तालुक्यातील जवळपास सर्व गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. बेपर्वार्ह नागरिकांच्या मुळे संपुर्ण तालुकाच कोरोनाच्या विळाख्यात सापडला आहे.







तालुक्यात मंगळवार केलेल्या विविध ठिकाणच्या तपासणीत  जत शहर 17,डफळापूर 15,येळवी 7,शेगाव 6,प्रतापपूर 9,खलाटी 4,लोहगाव 9,निगडी खु.3,काराजगी 4,वज्रवाड 7,डोर्ली 2,तिकोंडी 2,बिळूर 2,बेवनूर 3,अंकलगी 5,गिरगाव 2,कोसारी 1,आबाचीवाडी 1,बालगाव 1,अंतराळ 1,






कासलिंगवाडी 1,रामपूर 1,घोलेश्वर 1,संख 1,गुड्डापूर 1,वाळेखिंडी 1,अमृत्तवाडी 1,बसर्गी 1,कर्नाटक 1,मंगळवेढा 1,रांजणी 1 असे तब्बल 112 रुग्ण आढळून आले आहेत.






तालुक्यात मंगळवारी 12 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 569 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यातील 455 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here