जत,संकेत टाइम्स : राज्य शासनाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात नवे निर्बंध घातले आहेत.यात शनीवार,रवीवार पुर्ण लॉकडाऊन व इतर दिवशी शिथिलता असेल असे वाटत होते.मात्र शासनाचे आदेश नगरपरिषदेला प्राप्त होताच,मंगळवार पासून नगरपरिषदेकडून शहरातील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन केले आहे.
त्यानुसार अपवाद वगळता व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र कोरोनाचा तालुक्यात प्रभाव इतका वाढला नसतानाही अशा बंदने काय साध्य होणार आहे,असे व्यापाऱ्यांची भूमिका आहे.गतवर्षी लॉकडाऊन मुळे लग्नसराई,पाडवा असे महत्वाचे सण गेले आहेत.यावर्षीही पुन्हा तीच स्थिती उद्भवल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
जत शहरात प्रमुख बाजार पेठेत बुधवारी प्रमुख व्यापाऱ्यांनी बंद पाळला होता.काही ठिकाणी हातगाडे,व्यापारी भाजीपाला विकत बसलेले होते.तर किराणा,मेडिकल, दुग्ध जन्य पदार्थाची दुकानांने सुरू होती.
दरम्यान कोरोनापेक्षा निर्बंधाची मोठी भिती आम्हाला वाटत आहे.निर्बंध म्हणून पुर्ण दुकाने बंद करू नयेत,सरकारने निर्णय बदलावा असे आवाहनही शहरातील व्यापाऱ्यांनी केले आहे. दरम्यान संख,उमदी,माडग्याळ सह तालुक्यातील अनेक गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.
जत शहरात नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत दुकाने बंद होती.मात्र काही हातगाडे,भाजी विक्रेत्याकडून विक्री सुरू होती.