जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील अस्तित्व राहिले नसलेल्या नेत्यांनी अभद्र युती करून केलेल्या विकास कामाचा दावा बिनबुडाचा आहेे,आरोप करणाऱ्यांनी आपले घर अगोदर संभाळावे,आमचे आमदार तालुक्याचा विकास करणार हे निश्चित आहे,
अशी माहिती कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी दिली.राष्ट्रवादी कॉग्रेस,भाजपा एकत्र येत वीर शिवा काशिद उद्यान भूमीपुजन सोहळ्यातील टिका संदर्भात कॉग्रेस नेत्यानी पत्रकार बैठक घेतली.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग,कार्याध्यक्ष नाना शिंदे,विक्रम फांऊडेशनचे युवराज निकम,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,ओबिसीचे नेते तुकाराम माळी,परशुराम मोरे,मुन्ना पखाली,महादेव कोळी आदी नेते यावेळी उपस्थित होते.
नाना शिंदे म्हणाले, जत शहरात गेल्या चार वर्षात झालेली विकास कामे ही कॉग्रेस राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून झाली आहेत.तेथे एका पक्षाने श्रेय घेऊ नका,विलासराव जगताप यांच्याबरोबर विकास कामे करायची असतीलतर त्यांनी खुशाल करावीत. भाजपा एकसंघ नाही,त्याचे जिल्हा परिषद सदस्याच्या कार्यक्रमाला माजी आमदार उपस्थित राहत नाहीत.त्यांना आमचे नेते आमदार विक्रमसिंह सांवत यांच्यावर टिका करण्याचा अधिकार नाही.
भूपेंद्र कांबळे म्हणाले,जिल्हा बँक डोळ्यासमोर ठेवून भाजपा नेत्यांनी आमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना जवळ करून बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र राज्यात कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस महाविकास आघाडीत सत्तेत एकत्र आहोत.त्यामुळे जतेत अभद्र युती करू नका,तुम्हाला भाजपा बरोबर जायाचे असाल तर कॉग्रेस बरोबरची युती खुशाल तोडावी.कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवत हे चांगले काम करत आहेत.जनतेनी त्यांना 35 हजार मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यांच्यावर टिका करण्याअगोदर आपण कुठे आहोत.
याचा विचार करावा.तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात आले आहे. पत्रकारांनी एकदा त्या भागातील जनतेशी संवाद साधावा,म्हणजे खरे समजेल.राज्यात कॉग्रेस राष्ट्रवादी युती असताना जतेत राष्ट्रवादी व भाजपा युती कशी होऊ शकते.आमदार सांवत कुठेही उद्घाटने करतात म्हणून टिका केली जात आहे.मात्र यापुर्वी सत्तेत असणाऱ्यांनी कुठेकुठे उद्घाटने केली हेही जनतेला माहित आहे.
त्यामुळे अभद्र युती करून बळीचा बकरा न होता,आमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी आता महाविकास आघाडीत सत्तेत आहोत,तसेच एकत्र राहूयात.जतचा विकासासाठी आमिषाला बळा पडु नये,कॉग्रेस एकसंघ आहे.राष्ट्रवादी, भाजपचे अनेक सदस्य आमच्या संपर्कात आहेत.
जत येथील पत्रकार बैठकीत बोलताना कॉग्रेस नेते