जत,संकेत टाइम्स : गतवर्षी लॉकडाऊन ची परिस्थिती असून देखील वसुलीचे योग्य नियोजन,काटकसर, संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने जत येथील गणेश व्यापारी पतसंस्थेला चालू आर्थिक वर्षांत ढोबळ नफा 1 कोटी व नेट निव्वळ नफा रुपये 54 लाख झाल्याची माहिती चेअरमन श्री. मल्लीकार्जुन इटंगी (अडत व्यापारी)यांनी दिली.
इटंगी म्हणाले, पतसंस्थेने स्वताःच्या नवीन इमारती मध्ये सभासदांना चांगल्या सुविधा व कमीतकमी वेळेत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला आहे. कोरोना काळात ही संस्थेच्या ठेवी 9 कोटी, कर्ज वाटप 10.60 कोटीकेले असून,संस्थेचे एकूण स्वनिधी रुपये 4 कोटी,गुंतवणूक रु. 4 कोटी, एनपीए 0टक्के असल्याचे सांगितले.
तसेच पतसंस्थेने स्थापने पासून ‘अ’ वर्ग मिळवला आहे. संस्था अखंडित पणे सभासदांना डिव्हीडंड वाटप करत आली आहे.यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते.