उमदी,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा मनमानी कारभार चालू आहे.यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सभासद कर्जदार सभासदांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.बँकेतील बरेच कर्मचारी हे संचालकांची नातलग व जवळचे असल्याने त्यांचा मनमानी कारभार चालू आहे.कर्मचारी व संचालक मंडळ यांच्या वर्तुणुकीत बदल करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना शाखा सांगलीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपकुमार हिंदुस्थानी यांनी केली आहे.
सध्या शिक्षक बँकेची नुकतीच सर्वसाधारण सभा 2020 ची कोरोनामुळे लांबलेली सभा मार्च मध्ये ऑनलाईन पार पडली.ही सभा फक्त सत्तारूढ संचालकांचीच होती यामध्ये सभासदांना आपले विचार व्यक्त करण्यास संधीही दिली नाही.आणि डिव्हिडंट ही झिरो दिला.मात्र सभासदांच्या हक्काच्या रक्कमेवर म्हणजे कायम ठेवी वर नाममात्र व्याज दिला.हा व्याज दर कवडीमोल दराने म्हणजे साडे सहा टक्केपेक्षा कमी दराने दिला.दरवर्षी प्रमाणे ही रक्कम सभासदांच्या खात्यावर जमा केली,ही काढून ही घेतली गेली.
त्यामुळे सभासदांची निराशा झाली आहे,पण ही रक्कम परस्पर सभासदांच्या खात्यातून काढून घेण्याचे बँक कर्मचारी यांनी योग्य उत्तर न देता उडवाउडवीची उत्तर दिले आहेत.मार्च 2020ची थकबाकी मार्च 2021च्या कायम ठेवींच्या व्याजातून घेतली गेली आहे.बँकेचे कर्मचारी गेल्या वर्षभरात पगारातून वसुली न घेता सध्याच्या ठेवींवरील व्याजातून कपात घेत आहेत.बँक कर्मचारी यांची चूक असताना वर्षभर गप्प बसून नेमकी ठेवींवरील व्याजातून कपात घेतले आहे.
सध्या बँकेत सभासदांना बँकेच्या चुकीच्या धोरणाचा फटका बसत आहे.तरी सभासदांचे कायम ठेवींवरील व्याज परत मिळावे अशीमागणी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपकुमार हिंदुस्थानी यांनी केली आहे.