जत,संकेत टाइम्स : जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका,जूगार,बेकायदा दारू,गांज्या,चंदन तस्करीसह अवैध वाहतूक जोमात सुरू असतानाही जत ठाण्याचे अधिकारी यांचा याकडे कानडोळा की पांठिबा असा काहीसा संशय जतेत तयार झाला आहे.
जत तालुक्यात मटका, जूगार वाढल्याचे थेट विधान सभेत आमदार विक्रमसिंह सांवत यांनी मांडले होते.तरीही जतची मुर्दाड पोलीस यंत्रणेमुळे हे अवैध धंदे बंद होण्याचे नाव घेत नाहीत.परिणामी तालुक्यातील युवा वर्ग अशा मटका,जूगारच्या आहारी जात असून शहरासह तालुक्यातील अनेक गावात अगदी मुख्य चौकात असे अवैध धंदे चालू आहेत.
किमान विधानसभेत याबाबत तक्रार केल्यावर तरी अवैध धंदे बंद होतील असे वाटत होते.मात्र जतचा कागदपत्री उत्तम कारभार बघणाऱ्या अधिकाऱ्यांची चुप्पी बरचं काही सांगून जात आहे.या अवैध धंद्यातील बरकतीसाठी ठाण्यात अनेक वर्षापासून ठिय्या मांडलेल्या तीन कर्मचाऱ्यांना नेमण्यात आले आहे, पोलीस ठाणे हद्दीत तब्बल दहा लाखावर या अवैध धंद्यातून कमाई होत असल्याची चर्चा आहे, त्यामुळेच पोलीसांचा या अवैध धंद्याना पांठिबा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.