गुरूशांत माळी
रुग्णांना जीवनदान देणारे, निरनिरळ्या आजारांमधून रुग्णांची मुक्तता करणारे असे डॉक्टर्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. आजार लहान असो, किंवा मोठा, आपले आरोग्य आपल्या डॉक्टर्सच्या हातामध्ये सोपवून आपण निर्धास्त होतो. ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काही डॉक्टर्स असे ही आहेत, ज्यांनी आपल्या कार्यामुळे आपले आगळे स्थान निर्माण केले आहे.
असेच जत तालुक्याचे सुपुत्र,काळभैरवनाथाच्या कर्मभूमीतील एक आदर्शवत व्यक्तिमहत्व,जत येथील हिराई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.राजेंद्र झारी हे होत.
नुकतेच त्यांना मुंबई येथील झी गुरूकूल फांऊडेशनचा वैद्यकीय क्षेत्रातील गौरव महाराष्ट्राचा 2020-21 या राज्यस्तरीय पुरस्कारांने विविध मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथील भव्य कार्यक्रमात गौरविण्यात आले.
बिळूर सारख्या कन्नड बाहुल गावातून आलेले डॉ.रांजेद्र झारी यांनी जत शहरात आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.तालुक्यातील गरीब,कष्ठकरी,सामान्य जनतेला योग्य, तात्काळ,अल्प खर्चात उपचार मिळावा हा उद्देश ठेऊनचं,खऱ्या अर्थाने डॉ.झारी यांच्या या कार्याला बळ मिळाले ते डॉ.राजेंद्र झारी व वैद्यकीय क्षेत्रातील व्यवस्थापनातील गाडा अनुभव असणारे गुरूशांत माळी यांनी सुरू केलेल्या हिराई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मुळे शेगाव चौकात सातारा रोडला उभ्या केलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज हॉस्पिटलमुळे तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचे हक्काचे माफक दरातील हॉस्पिटल म्हणून नावलौकिक आहे.
कोरोनाच्या जीवघेण्या पहिल्या लाटेत काही नामाकिंत डॉक्टर्स रुग्णावर उपचारासाठी टाळाटाळ करत असताना हिराई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.झारी 24 तास उपस्थित राहून रुग्णावर उपचार करून एकप्रकारे देशसेवा बजावत होते.कोरोना काळात कोरोना योध्दे पोलीस,महसूल प्रशासन,ग्रामपंचायत कर्मचारी,पत्रकार यांची मोफत तपासणी,विविध मोफत शिबिरे,या माध्यमातून डॉ.झारी यांनी व्यवसाया बरोबर समाजहिताच्या कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील वेगळी उंची निर्माण केली आहे.अशा समाजासाठी देव माणूस म्हणून काम करणारे डॉ.राजेंद्र झारी यांचा झी गुरूकूल फांऊडेशनच्या वतीने सम्मान करत गौरव महाराष्ट्राचा हा राज्यस्तरीय पुरस्काने देण्यात आला.
जत तालुक्यातील दुर्लक्षात दुष्काळी, गरीब,कष्ठकरी जनतेची करत असलेल्या सेवेची दखल घेत झी गुरुकुल फांऊडेशनने माझा ‘गौरव महाराष्ट्राचा’ हा पुरस्कार देत सन्मान करण्यात आला.यामुळे माझ्या कार्याला आणखीन बळ मिळाले असून यापुढेही असेच कार्य माझ्याकडून होत राहिल.
– डॉ.राजेंद्र झारी,जत
कोल्हापुर येथे डॉ.राजेंद्र झारी यांना गौरव महाराष्ट्राचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.