सांगली : सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी व गाड्यांचे बॅटरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक करत तब्बल 5 गुन्हे उघड उघडीस आणण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. चोरी,घरफोडी,गांड्यांचे बॅटरी चोरी,जबरी चोरी, मोटार सायकल चोरी यासारखे गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव
गायकवाड यांच्या मार्गदर्शना खालील सा.पो.नि.रविराज फडणीस यांच्या पथकाला अमिन मुल्ला रा.शामरावनगर सांगली व त्याचे साथीदारांनी बऱ्याच ठिकाणी चोऱ्या
केल्या असून चोरीचा माल विक्री करणेचे प्लॅनिंग करणेकरीता ते अंकली ते मिरज जाणारे रोडजवळ जैन वडा अंकली समोर थांबले आहेत अशी माहिती मिळाली.
मिळाले माहिती प्रमाणे तेथे सापळा लावून जैन वडा,अंकली जवळ त्यास ताबेत घेऊन सहा.पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी त्यांचे नाव गा,अमीन मिरासाहेब मुल्ला वय 23 वर्षे रा.मुकेश किराणा दुकानासमोर,
शामराय नगर सांगली, व एक विधीसंघर्ष बालक असे असल्याचे सागितले. त्याचे कब्जात मिळाले मोबाईल बाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देवु लागले
त्यास पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने मी व त्याचा साथीदार असे मिळुन सांगली शहर, सांगली ग्रामीण,संजयनगर, म.गांधी चौकी पोलीस ठाणेच्या हदीतील वेगवेगळ्या ठिकाणी 8 मोबाईल चोरले असल्याबाबत सागितले.त्यावेळी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे येथे खात्री केली असता सांगली ग्रामीण
पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले आहे