जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात वाढलेला उन्हाच्या तडाक्यामुळे आगीच्या घटना वाढल्या असून यामुळे तालुक्यात सुमारे 7 ठिकाणी घरांना आगी लागून कुंटुबे उघड्यावर आली आहेत.या कुंटुबियांना तालुक्याचा कुंटुब प्रमुख म्हणून आमदार विक्रमसिंह सांवत हे तात्काळ मदतीचा हात देत आहेत.घटना घडताच तातडीने आ.सांवत संबधित कुंटुबियांची भेट घेतात.त्यांना धीर देत पाण्याचा पिंप,घागर,बादली,ताट,वाट्या,डब्
त्याशिवाय शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.दुर्गंघटना ग्रस्त कुंटुबियांना या तातडीच्या मदतीचा मोठा आधार मिळत आहे.
तालुक्यातील जनतेच्या सुख,दु:खाच्या घटनेत आम्ही कुंटुब प्रमुख म्हणून आगीमध्ये सर्व हिरावलेल्या कुंटुबियांना यातून काहीअंशी सावरण्यासाठी तात्काळ मदत करत आहोत,असे आ.विक्रमसिंह सांवत यांनी सांगितले.
शनिवारी खैराव येथे सिलेंडरचा स्फोट होऊन नुकसान झालेेले दिपक बाळू ढगे यांच्या कुंटुबियाची आ.सांवत यांनी तातडीने भेट घेत मदतीचा हातभार लावला.यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, खैरावचे संरपच राजू घुटूकडे,कोडीबा घुटूकडे,भारत क्षीरसागर,जैनू मुलाणी,येळवीचे उपसंरपच सुनिल अंकलगी,दीपक अंकलगी,प्रवीण तोडकर उपस्थित होते.
खैराव ता.जत येथील दीपक ढगे कुंटुबियांना मदत देताना आमदार विक्रमसिंह सांवत व पदाधिकारी