पत्नीला वाचवताना पतीचा विजेचा धक्का लागून मुत्यू

0
5



जत,संकेत टाइम्स : विजेचा धक्का लागलेल्या पत्नीला बाजूला वाचविताना पतीचा शॉक लागून मुत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज रविवारी (ता.28)दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास मायथळ (ता.जत)येथे घडली.पांडुरंग इराप्पा भुसनूर (वय 45) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.सुरेखा पांडुरंग भुसनूर असे जखमी पत्नीचे नाव आहे.







अधिक घटनास्थळावरून  माहिती अशी,पांडुरंग भुसनूर यांच्या पत्नी होळीचा सणामुळे घरातील साफसफाईचे काम होती. दरम्यान घरातील पिठाच्या चक्कीची साफ सफाई करत असताना पत्नी सुरेखा यांना विजेचा धक्का लागला.

त्यांनी आरडाओरडा केला,तेथेच असणारे पती पांडुरंग भुसनूर हे तिकडे धावले.






पिठाच्या चक्कीला जोडलेली केबल त्यांनी खेचल्याने पत्नी सुरेखा बाजूला फेकल्या गेल्या मात्र विजेची केबलचा स्पर्श त्यांना झाला त्यात विजेचा धक्का बसल्याने पांडुरंग भुसनूर कोसळले.त्यात त्यांचा जागीच मुत्यू झाला.तर पत्नी सुरेखा भुसनूर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान ऐन होळीच्या सणाच्या दिवशी झालेल्या दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here