जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लवकरचं ; खा.संजयकाका पाटील यांची जतेत माहिती

0
6



जत,संकेत टाइम्स : सांगली जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल लवकरचं करण्यात येईल,त्या संदर्भात आम्ही बैठक घेतली आहे, अशी माहिती खा.संजयकाका पाटील यांनी आंसगी जत येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा परिषद कार्यकाळ पुर्ण होण्यास थोडा कालावधी उरला आहे.आम्ही सदस्यांना शब्द दिला आहे, त्याप्रमाणे पदाधिकारी बदल निश्चित करण्यात येणार आहे.







जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप नेत्याशी मी बैठका घेतल्या आहेत.त्यात सर्वजण सकात्मक आहेत.काही जणांची नाराजी आहे ती दूर करण्यात येईल.सांगली महापालिकेत काही गोष्ठी घडल्या आहेत.मात्र तसा प्रकार जिल्हा परिषदेत होऊ देणार नाही,असे खा.पाटील म्हणाले.







माजी आमदार विलासराव जगताप हे पदाधिकारी बदलासाठी इच्छुक नाहीत,या प्रश्नावर पाटील म्हणाले,माझे जगताप यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनाही या बदलाबाबत बोललो आहे.कार्यक्रमा नंतरही त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.जिल्ह्यातील सर्व भाजपा नेते पदाधिकारी बदल करण्यासाठी अनुकूल आहेत.त्याशिवाय आम्ही दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी पदाधिकारी बदल लवकरचं करण्यात येणार आहे, असेही खा.शेवटी म्हणाले.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here