जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा शनिवारी प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले.शनिवारी तालुक्यात फक्त 5 नवे रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.
गेल्या आठवड्यात वाढलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा आलेख खाली आला आहे.
शनिवारी जत शहर 2,शेगाव 1,बोर्गी बु.2 असे 5 रुग्ण आढळून आले आहेत.
यामुळे तालुक्यातील संख्या 2261 झाली आहे. त्यापैंकी 2039 जण कोरोनामुक्त झाले आहेत.सध्या 147 जण उपचारा खाली आहेत.






