जत,संकेत टाइम्स : शेगाव,बनाळी जिल्हा परिषद मतदार संघातील विज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून वीज बिल वसूलीसाठी अन्याय कारक थेट सर्व गांवाचा विज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार घडला होता.या प्रकारा विरोधात सभापती सुनीता पवार, शेगाव जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता जाधव यांच्या नेतृत्वाखाली जत विभागीय कार्यालयावर मोर्चा नेहत ठिय्या मांडला.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार,अजिक्यंताराचे अँड.प्रभाकर जाधव,नगरसेवक उमेश सांवत,युवा मोर्चाचे अध्यक्ष बसवराज पाटील,संतोष मोटे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
अन्याय कारक विज पुरवठा खंडीत केलाच कसा,तुम्हाला तसे आदेश आहेत काय,मग हप्ते करून देण्याची योजना कशाला आणली,पठाणी वसूली थांबवा अशा मागण्यात करत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.तालुक्यात कुठेही पुर्ण गावाचा विज पुरवठा खंडीत केला जात नाही,मग शेगाव,बनाळी जिल्हा परिषद मतदार संघातील गावे काय पाकिस्तानात आहेत काय?,एकाही शेती पंपासह घरगुती ग्राहकांची वीज कनेक्शन तोडू देणार नाही,पुर्वरत वीज पुरवठा सुरू करावा,असे सांगत भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकापुढे विज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करत बंद वीज पुरवठा तात्काळ सुरू केला.व यापुढे शेती पंप,घरगुती ग्राहकांच्या बिलाचे दोन-तीन हप्ते करून देण्यात येतील,ज्यांची जशी बिले भरण्याची कुवत आहे,तशी वसूली करावी,बिले आली नाहीत म्हणून कोनाचेही विज कनेक्शन तोडले जाणार नाही,असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी
जत विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपाकडून मोर्चा नेहण्यात आला







