जत,संकेत टाइम्स : प्रत्येक योजना विना अडचण लाभार्थ्यापर्यंत पोहचली पाहिजे,योजनेपासून गावांचा विकास हा शासनाचा उद्देश आहे.त्यामुळे तालुकास्तरीय अधिकारी,स्थानिक ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी,कोणत्याही अडचणी आम्ही सोडवू असे आवाहन आ.विक्रमसिंह सांवत यांनी केले.
जत तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महा आवास अभियान,जल जीवन मिशन,व 15 वा वित्त आयोग योजने अंतर्गत शाळा व अंगणवाडी नळ कनेक्शन देणे कार्यशाळा आदी योजनाचा आढावा आमदार विक्रमसिंह सांवत यांनी घेतला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सरदार पाटील,माजी सभापती बाबासाहेब कोडग,कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तालुक्यात आलेला निधी,योजनेबाबतच्या अडचणी,प्रशासकीय परवानग्या,स्थानिक विषय मार्गी लावण्यासाठी या आढावा बैठकीचे पंचायत समिती गणानिहान आयोजन करण्यात आले होते.आ.सावंत यांनी सर्वाच्या समस्या जाणून घेत त्या तात्काळ सोडविण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,संबधित विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक,संरपच उपस्थित होते.
जत येथील आढावा बैठकीत समस्या समजावून घेताना आ.विक्रमसिंह सांवत







