जत,संकेत टाइम्स : जत तालुका संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांना सोरडी येथे 12 जणांनी हल्ला करत गंभीर मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे.विशेष म्हणजे तलाठी महोदय घर बांधकामासाठी घरासमोर टाकलेल्या वाळूचा पंचनामा करण्यासाठी गेले होते,असा आरोप गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी केला आहे.
याप्रकरणी लक्ष्मण पुतळाप्पा चांबरे,मणगिनी पुतळाप्पा चांबरे,गौराबाई पुतळाप्पा चांबरे,राहुल लक्ष्मण चांबरे,विकास मनगणी चांबरे,राजू मणगिनी चांबरे,बिरा शंकर चांबरे,बिरा चांबरे,व अनओळखी चार (सर्वजण रा.चांबरे वस्ती,सोरडी)
अशा 12 जणावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,शुक्रवार ता.26 मार्च रोजी सोरडीचे तलाठी तथा तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जगताप हे सोरडीतील चांबरे वस्ती येथे अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करण्यासाठी गेले होते.दरम्यान आमचाच का पंचनामा करताय म्हणून वस्तीवरील संशयित 12 जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर मारहाण केली आहे.त्यात खुरप्याने हल्ला झाल्याने जगताप यांचे हाताचे बोट तुटले आहे.
याप्रकरणी जगताप यांच्या तक्रारीवरून संशयित बारा जणावर भादवि 353/232/333/327/143/147/148/
दरम्यान ही बाब गंभीर असून शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे निंदनीय आहे.संबधितावर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून संशयित हल्लेखोरांना त्वरित अटक करावी,जो पर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यत जत उपविभातील सर्व तलाठी,मंडळ अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.









