कासलिंगवाडीत कोरोनाचा कहर सुरूच | नवे 12 रुग्ण

0
6



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कासलिंगवाडी कोरोनाचा कहर सुरूच आहे.गुरूवारी पुन्हा ‌12 तर,जत शहरातही नवे 11 रुग्ण आढळून आल्याने धोका वाढला आहे.





तालुक्यातही नवे 28 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.






येळवी 1,लकडेवाडी 1,जत शहर 11,कोसारी 1,कुंभारी 1,बेळोंडगी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.यामुळे तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 2240 झाली आहे.2036 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 129 रुग्ण सध्या उपचारा खाली आहेत.






दरम्यान तालुक्यातील कासलिंगवाडी तील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. गुरूवारी पुन्हा नवे 11 रुग्ण आढळून आल्याने धोका बळवला आहे.आरोग्य‌ यंत्रणा कासलिंगवाडीत तळ ठोकून आहेत.नागरिकांच्या दररोज तपासण्या सुरू आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here