पॉलिसच्या बहाण्याने पावनेसहा तोळे सोने लंपास | दोघा भामट्याचे कृत्य

0
9



जत,संकेत टाइम्स : बसरगी ता.जत येथील सिंदूर रोड येथे राहणाऱ्या सुवर्णा बापूराया बिराजदार (वय 65)यांच्या घरात आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सोने पॉलीस करण्याच्या बहाण्याने पावने सहा तोळे सोन्याचे दागिणे लंपास केल्याची घटना मंगळवारी सायकांळी 3 वाजता घडली.







याप्रकरणी दोन अज्ञात इसमाविरोधात जत पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.

अधिक माहिती अशी, बसरगीतील सिंदूर रोडला सुवर्णा बिराजदार या कुटुंबियासह राहतात.मंगळवारी सायकांळी 3 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसम मराठी,कन्नड बोलणारे घरासमोर आले.त्यांनी आम्ही सोने पॉलीस करणाऱ्या कंपनीकडून आलो आहोत,असे सांगून विश्वास संपादन केला.





प्रथम चांदीचे दागिणे पॉलीस करून चकाकचक करून दिले.त्यानंतर सोन्याचे दागिणे पॉलीस करून देतो,म्हटल्यानंतर सुवर्णा यांनी त्यांची सून,मुलीचे गळ्यातील मंगळसुत्र,कानातील टॉपस् असे पावने सहा तोळ्याचे दागिणे त्यांच्याकडे दिले.त्यांनी घरातील कुकर आणण्यास सांगितले.हातचलाखी करत सोन्याचे दागिणे काढून घेत कुकर बंद करून सुवर्णा यांच्याकडे दिला, काही काळ पाण्यामध्ये उकळा म्हणून सांगितले.त्यादरम्यान संशयित दोघानी पळ काढला‌.






सुवर्णा यांना संशय आल्याने त्यांनी कुकर उघडून बघितले असता त्यात दागिणे नसल्याने लक्षात आले.सुवर्णा यांनी तात्काळ त्यांचा मुलगा राजकुमार यांना माहिती दिली.राजकुमार यांनी संशयित दोघाचा पाटलाग केला मात्र ते भरधाव वेगाने कर्नाटकातील कोहळ्ली रोडने पलायन केले.दरम्यान सुवर्णा यांनी जत पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे.

अधिक तपास सा.पो.नि.भोसले करत आहेत.




Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here