जत तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान
जत,संकेत टाइम्स : कोरोनाची दुसरी लाट आता सुरू झाली असून कोरोनाचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्याच्या उद्देशाने जत तालुक्यातील अडचणीतील कोंतेबोबलाद,बिळूर,येळवी,वळसंग या प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.
पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम व मान्यवरांच्या हस्ते हा प्रदान सोहळा झाला.
जत तालुक्यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्रापैंकी 108 च्या 2 रुग्णवाहिका, 2 मोठ्या रुग्णवाहिका,8 टाटा सुमो अशी वाहने होती.त्यातील कालबाह्य झालेल्या चार केंद्रांना सुसज्ज नव्या रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या आहेत.
अनेकवेळा दोन किंवा त्यापेक्षा जादा अपघात घडल्यानंतर मात्र एकाच रुग्णवाहिकेमुळे अडचण निर्माण होत होती.कोंतेबोबलाद,बिळूर,येळवी या केंद्राना खऱ्या अर्थाने या रुग्णवाहिकेची गरज होती.त्याशिवाय वळसंग केंद्राला दिलेल्या रुग्णवाहिकेमुळे जत-चडचडण या राज्यमहामार्गावर अपघात समयी या रुग्णवाहिकेचा मोठा उपयोग होणार आहे.







