माडग्याळ,संकेत टाइम्स : कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर माडग्याळ ग्रामीण रुग्णालयात दररोज 60 वर्षावरील सुमारे 80-100 नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.त्यामुळे भविष्यात कोरोना रोकण्यात याचा फायदा होणार आहे.
माडग्याळ ग्रामीण रुग्णालय परिसरातील 45-60 वर्षावरील रक्तदाब,मधुमेह असे आजार असणाऱ्या नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.
डॉ.विजयकुमार नाईक म्हणाले,कोरोनाचा वाढलेल्या प्रभाव यामुळे या भागात संसर्ग रोकता यावा यासाठी शासनाकडून मिळालेल्या लसीचे दररोज सुमारे 70-100 नागरिकांना लस टोचण्यात येत आहे. दररोज नवे नागरिक कोविड पोर्टलवर नावे नोंद करत आहेत.
45-60 वर्षावरील नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लस टोचून घ्यावे,असे आवाहनही डॉ.नाईक यांनी केले आहे.
माडग्याळ ता.जत येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड लस टोचण्यात येत आहे.








