भिवर्गी ते भिवर्गी फाटा रस्त्याची दुरावस्था

0
4



भिवर्गी,संकेत टाइम्स : भिवर्गी ते भिवर्गी फाटा या 5 किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे.रस्ता केल्यापासून खड्डे भरले नसल्याने खड्ड्याचा घेर दोन तीन फुट वाढला आहे.






भिवर्गीला जोडणारा हा महत्वाचा रस्ता दहा वर्षापुर्वी डांबरीकरणचा करण्यात आला आहे. तीन वर्षापुर्वी रस्त्याचे पँचवर्क काम केले होते.

महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातून कर्नाटकातील विजापूरकडे जाणारा हा‌ रस्ता असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.मात्र संबधित विभागाचे या अड्डे युक्त रस्त्याकडे लक्ष गेलेले नाही.






परिणामी वाहन धारक,दुचाकी स्वारांना कमरेचे आजार जडले आहे.अनेक वाहनाचे पार्ट्स खिळखिळे झाले आहेत.

तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी,अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.







भिवर्गी ते भिवर्गी फाटा रस्त्याची झालेली दुरावस्था

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here