कासलिंगवाडीत कोरोना विस्फोट,आतापर्यत‌ 42 रुग्ण

0
5



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून सोमवारी एकाच‌ दिवशी तालुक्यात नवे 25 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

तालुक्यातील कासलिंगवाडी कोरोनाचे हॉटस्पाट ठरले आहे.






कासलिंगवाडीत एका लग्न कार्यासाठी एकत्र आलेल्या नागरिकांपैंकी आतापर्यत 42 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे चिंता वाढली असून आरोग्य विभागाचे सर्व लक्ष आता कासलिंवाडीकडे वेधले आहे.लग्न कार्यात एकत्र येणें येथील नागरिकांना महागात पडल्याचे चित्र आहे.





प्राथमिक गावभाग व संबधित नातेवाईकांच्या वस्तीवरील जवळपास सर्वच लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैंकी सोमवारी पुन्हा 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.






त्याशिवाय जत शहर 5,बिळूर‌‌2,धावडवाडी 1येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील ‌चिंता‌ यामुळे वाढली आहे.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here