उमदी जि.प.पोट निवडणूक, पुढार्‍यांची लगबग | लवकरचं‌ निवडणूकीची घोषणा शक्य

0
11



उमदी,संकेत टाइम्स : उमदी जि.प.पोट निवडणूकीच्या धरर्तीवर ग्रामीण भागात गावपुढार्‍यांची लगबग सुरू झाली आहे. उमदीत लवकरचं जिल्हा परिषद निवडणूक होत असल्याने उमदी परिसरात त्यांच्या भेटीगाठींना गती आली आहे. आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या विजयानंतर येथे लवकरचं पोट निवडणूक होणार आहे.त़्यामुळे इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे. भेटीगाठींना जोर आला आहे.






पुन्हा एकदा उमदी परिसर ढवळून निघणार आहे. त्यासाठी गावपुढार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी रेटण्यासाठी त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. मतदार संघातील प्रत्येक गावात पोहोचून ते मतदारांचे उंबरठे झिजवीत आहे. आपली उमेदवारी कशी मजबूत राहणार आहे, याची ते मतदारांना खात्री पटवून देत आहे.

प्रशासनाकडून मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही दिवशी निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.






पुढील दिड वर्षासाठी निवड होणार असल्याचे इच्छूकांत जोष ‌दिसून येत नाही.तरीपण कॉग्रेसकडून आपला गड‌ आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न निश्चित आहेत.तर भाजपाची तयारी गतिमान झाली आहे. राष्ट्रवादीकडून आपला मतदार संघ ताब्यात घेण्यासाठीही ताकत लावली जाणार हे निश्चित आहेत.

कॉग्रेसचे निवृत्ती शिंदे,भाजपकडून संजय तेली,राष्ट्रवादी कॉग्रेसकडून चन्नाप्पा होर्तीकर हे उमदेवार मैदानात उतरू शकतात,तसेच बेळोंडगी सोसायटीचे चेअमन सोमलिंग बोरामणी व काही अपक्ष निवडणूक लढवू शकतात.






पारावर रंगू लागल्या गप्पा
ग्रामीण भागात गावातील पारावर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here