गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा | भाजपचे जतेत आंदोलन ; विलासराव जगताप यांनी आघाडी सरकारवर डागली तोफ

0
7



जत,संकेत टाइम्स : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्र्यांनी 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला. त्यावर आता विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून गृहमंत्री अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.त्यासाठी जत भाजपने शहरातील हनुमान मंदिरासमोर आंदोलन केलं आहे.






यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडीचे सरकार खंडणीखोर असून गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. 

या आंदोलनात ठाकरे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत हे सरकार खंडणीखोर सरकार असून तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले, सचिन वाझेच्या माध्यमातून हे सरकार खंडणी गोळा करत असल्याचं उघड झालंय. 







अजून किती वाझे या सरकारकडे आहेत याचा तपास केला पाहिजे, सरकारला थोडी जरी शरम असेल तर त्यांनी सत्ता सोडावी अशी मागणी त्यांनी केली. 

यावेळी बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष सुनिल पवार म्हणाले,आघाडी शासनातील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सारख्या एका प्रमुख मंत्र्यावर आरोप झाले असताना जतचे आमदार अजून मूग गिळून गप्प का? त्यांनी गृहमंत्र्यांचा निषेध करावा,असा टोला लगावला.यावेळी बोलताना भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सरपंच बसवराज पाटील म्हणाले की,वाझे प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख हे फक्त प्यादे आहेत. 






यामागील मास्टर माईंड निराळाच असून केंद्रीय तपासणी पथक नेमून या प्रकरणाची चौकशी करून मास्टर माईंडला शोधावे.भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप, पापा कुंभार, मिलिंद पाटील, प्रमोद सावंत,  प्रकाश मोटे,नगरपरिषदचे सभापती प्रकाश माने, सरपंच राजाराम जावीर, आयुब सय्यद, सुनिल आरगोडी यांच्या सह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.






जत येथे आघाडी सरकारचा भाजपने निषेध करत आंदोलन केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here