जत,संकेत टाइम्स : येऊ घातलेल्या शिक्षक बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील अनेक शिक्षक नेते नेमणूक असलेल्या शाळात अनेक वेळा गैरहजर राहत असल्याचे आरोप होत आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. अशा काही शिक्षक नेत्यांच्या शाळांची जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांनी तपासणी करावी,अशी मागणी पालकांतून होत आहे.
जत तालुक्यात शाळेत कमी,व राजकारणात जादा असे अनेक शिक्षक
जिल्हा,तालुकाभर फिरत आहेत.मात्र एकीकडे शासनाचा हाजारोंचा पगार घ्यायचा,शाळेत सह्या करण्यापुर्ते हजेरी लावायची,असे अनेक शाळात प्रकार घडत आहेत.काही शिक्षकतर जिल्हा नेते म्हणून जिल्ह्याभर फिरत आहेत.महिन्यात अनेक दिवस त्यांचे जिल्हाभर कार्यक्रम दिसतात,ते नेमके त्या दिवशी रजेवर असतात,कि दुसऱ्या दिवशी सही मारतात,याची तपासणी करण्याची गरज आहे.
केंद्र, तालुका स्तरीय अधिकाऱ्यांवर संघटनेचे नाव घेत दबाव टाकत असल्याने अशा नेत्याच्यावर संबधित शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याचेही चर्चा आहे.
काही अपवाद वगळता अनेक शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी असणाऱ्या शाळाची जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी गोपनीय तपासणी करावी,म्हणजे सत्य बाहेर येईल.








