मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप वाढलेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय.
राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल 25681 नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण 70 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 टक्क्यांवर आले असून मृत्यूदर 2.20 टक्क्यांवर आला आहे.







