बिळूर येथे एकाची आत्महत्या

0
8



जत,संकेत टाइम्स : बिळूर (ता.जत) येथे एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गुरूबसू निंगाप्पा मुडशी (वय 39, रा. बिळूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.गुरूवारी सकाळी 12 वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. 






कुटुंबातील व परिसरातील नागरिकांनी त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची जत पोलिस ठाण्यात रूग्णालयातील डॉ. नाईक यांनी फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक सचिन हाक्के करत आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here