जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या चार दिवसात 56 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात 16 मार्चला 22 व आज ता.19 ला 26 सापडलेला रुग्ण चिंता वाढविणारी आहे. गेल्या चार दिवसात तालुक्यात कोरोना प्रभाव वाढला आहे. गेल्या चार दिवसापासून नियत्रंणात असणारी रुग्ण संख्या हाताबाहेर गेली आहे.शुक्रवारी कासलिंगवाडीत कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
एकाच दिवशी तेथे 20 तर कुणीकोणूर 1,जत 1, शेगाव 2 अन्य ठिकाणी 2 असे 26 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
कासलिंगवाडीत एका लग्न समारंभासाठी एकत्रित आलेले सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील सध्या 59 रुग्णावर उपचार सुरू आहेत.48 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
दरम्यान रुग्ण संख्या वाढल्याने जत मधिल मुलीचे वसतीगृह येथील बंद कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले असून कोरोनाचे राज्यभरात दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातही नवे रुग्ण झपाट्याने मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.
त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टसिंग,सँनिटायझर सारख्या सुचना काटेकोर पाळून आपल्यासह कुंटुबांची काळजी घ्यावी,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.








