लाखोचा कर थकला | 12 पवनचक्की,6 मोबाईल टॉवर सील |

0
7



वळसंग,संकेत टाइम्स : जत तालुक्यात तब्बल 550 पवनचक्की व मोबाईल टॉवरच्या माध्यमातून पवनऊर्जा कंपन्या कोट्यावधीची कमाई करतात,मात्र शासनाचे कर भरण्यात या कंपन्याची उदासीनता सातत्याने समोर येत आहे.मार्च महिन्याच्या पहिला पंधरवडा संपला तरीही कर न भरलेल्या कंपन्यांना संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी दणका दिला.पवन ऊर्जा कंपन्याच्या 12 पवनचक्की व 6 मोबाईल टॉवर सील करत सक्त इशारा दिला आहे.






आठवड्या भरात कर जमा न झाल्यास उर्वरित पवनचक्की,मोबाइल टॉवर सील करण्यात येतील,अशा सुचना कंपन्याना देण्यात आल्या आहेत. 

मार्च महिन्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पवनचक्की,मोबाइल टॉवर,स्थानिक कर वसूलीची मोहिम राबविण्यात येत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा उद्योग उभारण्यात आले आहेत.त्याशिवाय मोबाईल कंपन्याचे अनेक गावात टॉवर उभे करण्यात आले आहे. या माध्यमातून या कंपन्या करोडो रूपये कमवत आहेत.







मात्र शासनाने निश्चित कर भरण्यासाठी या कंपन्याना मार्च महिना उजडावा लागत आहे.यावर्षी कंपन्यानी सर्व हद्द पार केली आहे.मार्च संपत आला तरीही कर भरला नाही.त्यामुळे प्रशासनाने कंपन्याचे पवनचक्की, टॉवर सील करण्याची कारवाई सुरू केली आहे.

वळसंग पासून माडग्याळ, कोळगीरी, पाच्छापुर, मुचंडी, काराजनगी रावळगुंडवाडी या भागातील पवनचक्की कंपन्याकडे तब्बल 50 लाखाचा कर थकीत आहे.






गुरूवारी अखेर संखचे अप्पर तहसीलदार हणंमत म्हेत्रे, माडग्याळ तलाठी व्ही.व्ही.उदगीरे, मंडळ अधिकारी माडग्याळ बुचडे, मंडळ अधिकारी मुचंडी श्री.कोळी,

तलाठी मुचंडी गणेश पवार, तलाठी सोनपरोते,तलाठी खिलारे, तलाठी विनायक बालटे,शिंदे,ठाकरे यांनी 12 पवनचक्की,व 6 मोबाइल टॉवर सील केले.दरम्यान कारवाई नंतर 7 लाख रूपयाची कर भरण्यात आला आहे.

तहसीलदार म्हेत्रे म्हणाले की,ग्रामीण भागात असणाऱ्या ग्रामपंचायत यांचा उत्पन्न आणि कर वसुली ही महत्त्वाची बाब असून त्याची वेळीच वसुली करून किंवा कर भरून स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करणे,हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य आहे.






संख अप्पर तहसील हद्दीतील 415 पवनचक्कीच्या थकीत कर भरण्याबाबत वारंवार नोटीसा व सूचना देऊन ही कर थकविणाऱ्या कंपन्यांचे प्रकल्प, उद्योगधंदे यांच्यावर कारवाई करत त्याचे उद्योग सील करण्यात येत आहेत.वेळीच थकीत रक्कम भरून कंपन्यांनी सहकार्य करायला हवे,अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागेल,असा इशाराही यावेळी यांनी केले.





संख अप्पर तहसील कार्यालय हद्दीतील थकीत करासाठी पवनचक्की सील करण्यात आल्या.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here