जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात गुरूवारी चार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील एकाच दिवसी वाढलेल्या कोरोना रुग्ण संख्येनंतर गेल्या दोन दिवसापासून रुग्ण संख्या नियत्रंणात आहे.
तालुक्यातील सध्या 40 रुग्णावर उपचार सुरू आहेत.त्यापैंकी 26 जण होम आयसोलेशन मध्ये आहेत.
दरम्यान जत मधिल मुलीचे वसतीगृह येथील बंद कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार असून कोरोनाचे राज्यभरात दुसरी लाट आल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातही नवे रुग्ण झपाट्याने आढळून येत आहेत.त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टसिंग,सँनिटायझर सारख्या सुचना काटेकोर पाळून आपल्यासह कुंटुबांची काळजी घ्यावी,असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.






