जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कृषी विभागाकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू केला असून संख येथील कर्मचारी सतत अनुउपस्थित राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीचे ठरत आहे.
संख येथे अपर तहसील कार्यालयाच्या धर्तीवर कृषी विभागाकडून स्वतंत्र कार्यालय सुरू करावेत अशी मागणी बहुजन समाम पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष तानाजी व्हनकडे यांनी तहसीलदार सचिन पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,संख परिसरातील शेतकऱ्यांनी सन 2018-19 व 2019-20 व 2020-21 मधील फळबागा लागवड केलेले अनुदान अद्याप जमा केलेेल नाही,ते तात्काळ जमा करण्यात यावे.संख मध्ये असलेले कृषीचे मंडल अधिकारी कार्यालय तात्काळ चालू करुन कायमस्वरूपी अधिकारी,कर्मचारी नेमावेत,सध्या कार्यरत असलेले कृषी सहाय्यक कामाची चौकशी करुन तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व नवीन कृषी सहाय्यकाची नेमणूक करावी.
तातडीने या मागण्या मान्य न केल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन ता.30 मार्च रोजी उपोषण करू,असा इशारा देण्यात आला आहे.
तालुका कृषी कार्यालयाचा कारभार तपासावा
जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते,त्यामुळेच विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची उभारण्यात आले आहे.मात्र येथे नेमलेल्या मुर्दाड व बेजबाबदार अधिकाऱ्यांच्यामुळे शासनाच्या योजनापासून शेतकऱ्यांना वचिंत रहावे लागत आहे,कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांची अधिकारी मीही तालुक्यातील आहे,
म्हणून हेळसाड करत असल्याची दमबाजी केली जात असल्याचे आरोप आहेत.दरम्यान दोन्ही कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पुर्व भागातील एका गावातील कृषी दुकानदाराला कारवाईचा धाक दाखवून लुटल्याची खुमासदार चर्चा आहे.असा भ्रष्ट कारभार कसा शेतकऱ्यांचा उद्धार करणार,असा प्रश्न उपस्थित होत आहे.









