जत,संकेत टाइम्स : रामपुर ता.जत येथील रामू भिमाण्णा मंडले यांच्या शेतातील डाळिंब बागेला महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागून 7 लाखाचे नुकसान झाले.
मंडले यांची रामपूर येथील सर्व्हे 46 मधील डाळिंब बाग आहे.त्या बागेतून गेलेल्या विद्युत वाहिन्यातून ठिनगी पडून बागेला आग लागली.त्यात हाताच्या फोडाप्रमाणे जगविलेली बागेतील डांळिब रोपे जळून खाक झाली आहेत.
त्यात 6 लाख 90 हजार 360 नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी रविंद्र घाडगे,तलाठी सुभाष कोळी यांनी केली आहे.दरम्यान महावितरनच्या भोगळ कारभारामुळे बागेचे नुकसान झाले आहे,तातडीने मदत द्यावी,अशी मागणी मंडले यांनी केली आहे.








